Best NEW Agriculture Android Mobail Apps for Farmers in marathi
बेस्ट शेतीविषयक मोबाईल ऍप्स Best Android Agricultural Mobile APP
आपला भारत देश कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाना शेतमालाचे ऑनलाईन भाव पाहणे, हवामान अंदाज घेणे कृषिविषयक सल्ला आदी कामे शेतकरी स्मार्ट फोन च्या मदतीने शेतकरी स्मार्ट व्हावेत या उद्धेशाने शेतीविषक अनेक Android Mobail Agricultural Apps उपलब्ध करून दिलेले आहेत. याची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग विविध ऍप्स बद्धल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Agricultural APP |
Agricultural Android APP
शेतीविषयक mobail Apps
1)Kisan Suvidha App - किसान सुविधा ऍप
Kisan suvidha App किसान सुविधा हे अॅप शेतकऱ्यांना शेतीविषक सर्व सल्ला उपलब्ध लवकरात लवकर होऊन पिक उत्पादक आणि उत्पादन या उद्धेश ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये लाँच केलेले आहे.या अँप च्या वापराने हवामान बदल, नविन मॅशनरी, योजना, फळबागा,ट्रेनिंग,अनुदान अश्या अनेक माहिती मिळण्यासाठी मदत होणारं आहे हे ऍप्स वापरण्यास अतिशय सोपे आहे. आजच्या हवामानाबरोबर पुढील येणाऱ्या ५ दिवसांची हवामान माहिती, जवळपासच्या बाजारातील पिकांच्या किंमतीबद्दल, आवक,यांची माहिती घरबसल्या मिळण्यास उपयोगी आहे अॅप अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
2)IFFCO Kisan Agriculture App-
iffco kisan Agricultural App
या ऍप्स चा उद्धेश शेकऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळेला तसेच योग्य निर्णय घेऊन त्यांना उत्पादन घेण्यासाठी माहिती वेळेवर अँड्रॉइड फोन वर मिळावी यानुसार इफको किसान हे अॅप २०१५ मध्ये लाँच करण्यात आलेले आहे. या अॅपच्या मदतीने शेतकरी बांधवाना शेतीविषयक सल्ला,हवामान, बाजारभाव यासारखी माहिती मिळन्यास मदत होते. या अॅपच्या वतीने हेल्पलाइन नंबर दिला आहे.या हेल्पलाईन नंबर च्या वतीने किसान सेवा सेंटरला फोन करून अधिक सेवा मिळवता येते.
3)RML Farmer- Krishi Mitr- APP
RML farmer Krishi Mitra APP
या अॅप च्या मदतीने प्रत्येक अँड्रॉइड धारक शेतकऱ्यांना राहतो त्या ठिकाणी जवळ असणाऱ्या प्रत्येक बाजारपेठेतील प्रत्येक शेतमाल उत्पादनांची किंमत तसेच बाजारातील शेतमाल आवक चढ उतार यांची माहिती मिळण्यासाठी मदत होते . बी-बियाणांच्या बाजाराभाव आवक कमी जास्त तुटवढा तसेच किंमत माहिती मिळण्यासाठी मदत होते शेतीविषयक असणाऱ्या सर्व चालू सरकारी योजनांची माहितीही या अॅपच्या मदतीने मिळते . या अॅप साहाय्याने शेतकरी देशातील १७+ राज्यातील ५०,०००+ गावातील ३५०० +ठिकाणावरील हवामानाचा अंदाज मिळण्यास मदत होते . तसेच या अॅपद्वारे १३००+बाजारातील ४५० +अश्या अनेक प्रकारच्या विविध पिकांविषयी माहिती मिळवता येते.
4)Crop Insurance App -
Crop Insurance Apps
या अॅपच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक संकटा तसेच काही कारणास्तव उत्पादन मिळू शकले नाही त्यासाठी भरपाई म्हणून पिकांच्या विम्याबाबात माहिती देते. या अॅपच्या मदतीने शेतकरी एकवेळ देणारी रक्कम, भरणारी रक्कम अनुदान रक्कम मिळवू शकतात. हे अॅपदोनच भाषा मध्ये उपलब्ध आहे.हिंदी आणि इंग्रजी उपलब्ध आहे.
5)Kheti-Badi App -
Kheti Badi App
या ऍपच्या मदतीने शेतकरी जैविक शेतीला चालना देऊ शकतात. जैविक शेती कशी करावी जैविक खत कश्या प्रकारे बनवावे जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच शेतकऱ्यांना जैविक शेतीची गोडी लागावी या उद्धेशाने हे ऍप्स चालू केलेले आहे. या ऍपच्या वापर करून खुप नवीन गोष्टी शिकू शकतात हे अॅप तीन भाषा मध्ये उपलब्ध आहे. हिंदी, मराठी आणि गुजराती
6)Agri App
अॅग्री अॅप
Agri APP या अँपच्या मदतीने पिक कोणकोणते घ्यावे. पिकांचे हवामान बदल रोग किडी यापासून स्वरक्षण कसे करता यावे याची अचूक माहिती देतेय. या अॅपच्या माध्यमातून चॅटचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे . कृषि तज्ज्ञांशी सल्ला विचारण्यासाठी संवाद साधता येतो.
7)Agri-Market App -
ऍग्री मार्केट ऍप्स
या अँप च्या माध्यमातून शेतकरी जेथे आहे तेथील 50 कि.मी. परिसरातील बाजारभावाची चढ उतार तसेंच आवक माहिती मिळावी. जिल्हा,तालुका,राज्यस्तरीय देशांतील दर माहिती मिळण्यासाठी मदत होते.
8)Krushi dhyan App -- कृषी ज्ञान
अॅपमध्ये माध्यमातून सर्व शेतकरी वर्गाला शेतीविषयक प्रत्येक बारीकसारीक माहिती प्रति सेकंदाला मिळन्यास मदत होते. सर्व माहिती तर या अॅपद्वारे मिळतेच तसेच अॅपद्वारे किसान कृषि ज्ञान तज्ञांना शेतकरी शेतीविषयक आपले प्रश्न सल्ला विचारून प्रश्नांची उत्तरे या अॅपमधील लिखित स्वरूपात नोटिफिकेशन्सद्वारे मिळतात.
9)Pusa krushi App -
या ऍप्स च्या माध्यमातून पिकांच्या विविध नवीन जातींची माहिती मिळावी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्या शेतकरी बांधवाना भगिनींना मिळावी या उद्देशाने २०१६ साली कृषि मंत्र्यांनी हे अॅप लाँच केलेले आहे.भारतीय कृषि रिसर्च इंस्टिट्यूट (IARI) येथील नवीन जातींची उपलब्ध माहिती तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर मिळावी या अॅपमध्ये शेतीविषयक उपयुक्त शेतकऱ्यांसंबंधीत माहिती असते.
10)Shetkari Masik App
शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध लेख मासिकाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. या मासिकातील लेख विविध रोग किडी विषयक, योजना विषयक, हवामान विषयक लेखक माहिती च्या स्वरूपात लिहीत असतात ही माहिती शेतकऱ्यांना मिळावी याचं उद्धेश ठेवून कृषी विभाग हे शेतकरी मासिक चालवत आहे.
11)Maharain App - Maharain app
Maharain app या ऍप्स च्या माध्यमातून शेतकरी बांधवाना मंडळ तालुका जिल्हा विभाग स्तर यातील आज पर्यंत सर्वसाधारण झालेले पाऊस याबाबत माहिती मिळण्यासाठी मदत होते.
12)mkisan india App -
mkisan India App कृषी हवामान विषयक उपयुक्त माहिती विविध पिक पद्धती सल्ला यांची माहिती मिळवण्यासाठी या ऍप्स चा उपयोग होताना पाहायला मिळतोय.
13)Digital Mandi india App -
Digital mandi India App
या ऍप्स च्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजारसमिती मधील विविध शेतमालाचे दर आपल्याला तालुका, जिल्हा, राज्य स्तरीय पहायला मिळण्यासाठी मदत होते.
14)Pashu Poshan App
पशु पोषण
या ऍप्स च्या माध्यमातून पशुपालनाचा आहारविषयक, जातीविषयक दूध उत्पादन वाढ, आरोग्य विषयक अशा विविध सल्ला मिळण्यासाठी उपयोग होताना पहायला मिळतोय.
15)cotton App
कापुस-
पांढरं सोनं या पिकाला संबोधलं जात असताना या पिकाविषयीं अधिक स्वरूपात शेतकरी वर्गाला माहिती मिळावी या उद्देश ठेवून हे ऍप्स विकसित केलेलं आहे. कीड रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन, जातींची माहिती, काढणीनंतर साठवनुक, ई बाबत माहिती मिळण्यासाठी उपयोग होतं आहे.
16)IPM App
एकात्मिक कीड व्यवस्थापन-
मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापण करून उत्पादन हमकास वाढ करण्यासाठी या ऍप्स चा उपयोग होतं आहे .या ऍप्स च्या मदतीने पिकांवर पडणारे किडी यांची माहिती तसेच त्यावर करण्यात येणारे उपचार याबाबत माहिती मिळण्यासाठी मदत होते.
17)हळद लागवड
Halad Lagwad App
आपल्या शेतकरी वर्गाला हळद लागवडी विषयी गोडी लागून प्रचंड उत्पादन घेऊन स्वतः चा ब्रॅण्ड बनवून विक्री करता यावी. हळद लागवड विविध जातींची माहिती, रोग किडी व्यवस्थापक माहिती. प्रक्रिया माहिती इत्यादी माहिती या ऍप्स च्या माध्यमातून होते
18) Plant Nutrition Apps -
पिक पोषण ऍप्स
मानवाला आरोग्य काळजी समजते तसेच शेतीला आरोग्य पिकांच्या माध्यमातून आपल्याला समजत असते. आपण जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी माती परीक्षण करून त्यात आवश्यक असणारे सर्व घटक माहिती आपल्याला कळते. कोणत्याही पिकाला विविध अन्नद्रव्याची गरज असतेय, आवश्यक कमतरता लक्षणे, अन्नद्रव्य संवेदनशील पिके सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य ई अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळण्यासाठी मदत होते.
19) Citrus Cultivation Apps -
लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड
लींबू वर्गीय फळपिकांची लागवड विषयक अंत्यत सुलभ माहिती मिळण्यासाठी मदत होते. या ऍप्स च्या मदतीने मोसंबी लींबू फळ झाड लागवड बाबत, जातीबाबत, रोग कीड सल्ला औषधं ई माहिती मिळण्यासाठी मदत होते.
20)Shekaru APP
शेकरू
या ऍप्स च्या मदतीने शेतकरी बांधवाना कृषि विषयक योजना, विविध कृषी प्रदर्शन, कृषी प्रशिक्षण वर्ग याबाबत अधिक माहिती या अँप च्या माध्यमातून मिळण्यासाठी मदत होते.
21)Crop clinic App
-क्रॉप क्लिनिक ऍप्स
या ऍप्स च्या मदतीने सोयाबीन, कापुस, भात, तूर, हरभरा या पाच पिकांची किडी व रोग यांची माहिती मिळण्यासाठी मदत होते. उपाय योजना कीड नाशके ट्रेड नेम व दुकान दार माहिती मिळण्यासाठी मदत होते.