Asthavinayk Darshan information महाराष्ट्र आपल्याला धार्मिक परंपराने नटलेला असून धार्मिक तेची नाळ खूप जोडलेली आहे देव दर्शन करणं आपली संकट देवाला सांगणं व त्यांच्याकडून प्रखर ऊर्जा घेणे यासाठी मानसिक प्रबळ बनविण्यात धार्मिक स्थाने आपल्याला महत्वाचं आहेत. आज आपण अष्टविनायक दर्शन बाबत माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र विविध डोंगर रांगा वसलेला असून गणपती मंदिर पण विविध ठिकाणी आढळून येतात पन आठ गणपती स्थान आठ मंदिर म्हणून अष्टविनायक असं मानलं गेलेलं आहे.सुखकर्ता दुःखहर्ता अशी आपण आरती म्हणतो ही आरती कोणी रचना केलीय तुम्हांला माहीत आहे तर ती रचना रामदास स्वामी यांनी केलीय मयुरेश्वर मंदिरात अशीच आपण विविध माहिती Asthavinayk Darshn App च्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग माहिती घेऊ.
Asthavinayk Darshan information in Marathi
Asthavinayk Darshan |
मोरगाव गणपती -मयुरेश्वर - morgaon Mayureshwar Ganpati information in Marathi.
अष्टविनायक पैकी पहिला गणराया म्हणून तसेंच बैठी व डाव्या सोंडेची मूर्ती डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरा बसवलेला मूर्तीच्या मस्तकावर नागराज विराजमान असलेले सिंधुसूर नावाच्या राक्षसाने ब्रम्हदेवाने बनवलेल्या मूर्तीची तोडफोड केली तेव्हा सर्व देवतांनी गणरायाला साकडे घातले तेव्हा गणराया ने मोरावर बसून त्या दैत्याचा वध केला तेव्हापासून मयुरेश्वर म्हणून ओळखले जातेय.
मंदिर -काळ्या दगडापासून बनवलेलं असून बाहमणी काळातील नोंद आढळून येतेयं. चारही बाजूने उंच मनोरे आहेत हे मंदिर मशिदी सारखे असून मंदिरात प्रवेश करताना 11पायऱ्या लागतात.
मूर्ती अख्यायिका - मुख्य गाभाऱ्यात पुर्वीकडे विराजमान असलेली बैठी मूर्ती डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले असून भाळावर नागराज आहेत.मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी सिद्धी यांची पितळी मूर्ती असून समोर मूषक व मयूर वाहन आहेत. ही मूर्ती खरी नसून पाठीमागे असलेली लहान वाळू व लोह रत्न अंश हिर्य यांच्या कणापासून बनवलेली आढळून आलेली आहे. ब्रम्हदेवाने कोणाचा धक्का लागू नये म्हणूनबंदिस्त केली आहे.गणेश भक्त मोरया गोसावी यांना पूजेचा वसा असून सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी येथेच स्फूरलं आहे.मंदिराच्या समोर नंदी विराजमान आहे हेचं शंकराच्या मंदिर बनविण्यात येत होते तिकडे नंदी चालले होते पण रथाचे चाक तुटल्याने येथेच विराजमान केले.मंदिराच्या आवारात शमी तसेंच मंदार वृक्ष आहेत पश्चिम दिशेला भक्तांची ईच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष टरती आहे.
मार्ग - हे ठिकाण पुणे जिल्हा बारामती तालुका मधील मोरगाव या ठिकाणी असून पुणे ते मोरगाव(जेजुरी सासवड मार्गे )अंतर 64km. आहे.चौफुला मार्गे अंतर्गत 55km आहे. बस सेवा उपलब्ध आहे.खाजगी सेवा सुद्धा उपलब्ध असतात.
2)चिंतामणी थेऊर Theur Chintamani Ganpati information in Marathi
-चिंतेचा हरण करणारा चिंतामणी हा दुसरा गणपती असून कदंब वृक्षाखाली स्वयंभू डाव्या सोंडेची डोळ्यात माणिक रत्न असून पेशवे घराणे भक्त होते.कपिल मुनीजवळ चिंतामणी रत्न होते गणासूर एकदा आला होता तर त्यांना पंचपक्वान जेवण दिले होते तेव्हा गणासुरास मोह निर्माण झाला हिसकावून रत्न घेतले तेव्हा कपिल मुनींनी विनायकाची धाव घेतली विनायक प्रसन्न होऊन कदंब वृक्षाखाली गणासूर पारिपत्य केले. मिळालेलं रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. तेव्हापासून चिंतामणी व नगराला कदंब नगर म्हणून ओळख झाली.माधवराव पेशवे यांनी थेऊरचा विस्तार केला त्यांचा मृत्यूही थेऊर या ठिकाणी झाला निरगूडकर फौंडेशन हे कलात्मक दालन आहे.
जाण्यासाठी मार्ग -पूणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे. लोणी काळभोर जवळ पुणे 22km अंतर आहे.
जवळील पाहण्यासाठी ठिकाणे -
भुलेश्वर -भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४० किमी.
नारायण बेट -श्री नारायण महाराज यांचे निवासस्थान बेट आश्रम दत्तमंदिर- पुणे-दौंड मार्गावर केडगांव चौफुला सुपा रोडवर आहे. अंदाजे अंतर ४३ किमी
रामदरा - पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे.यांस रामदरा असं नावं आहे.अंदाजे अंतर ४ ते ५ किमी
निसर्गोउचार केंद्र -उरळीकांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे. अंदाजे अंतर १३ km .
वाडेबोल्हाई -बोल्हाई देवी मंदिर -वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई माता मंदिर आहे. अंदाजे अंतर १३ km
3)सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक Shiddhatech SiddhiVinayak information in Marathi -
उजव्या सोंडेची मूर्ती असून भगवान विष्णू यांनी स्थापना केलेली स्वयंभू तीन फूट उंच व अडीच फूट रुंद सोवळ खूप कठीण आहे या मूर्तीचं.तोंड उत्तरदिशेला असून गजमुखी असल्याने एक मांडी घातलेली असून रिद्धी सिद्धी विराजमान आहेत.गाभरा व 15फूट उंच 10 फूट लांब मंदिर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांनी बांधला असून मखर पितळ सिंहासन पाषाण आहे.प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. मधु व कैटभ हे दानव भगवान विष्णू यांच्याबरोबर किती तरी वर्षे लढत होते भगवान शंकर यांनी गणेश आराधना करण्यासं सांगितली या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 5km चालावे लागते. अश्याच 21प्रदक्षिणा फडके यांनी घातल्या सरदारकी मिळवून घेण्यासाठी.
4)महड - वरदविनायकVardavinayak Mahad information in Marathi
-वर देणारा विनायक म्हणजेच वरदविनायक असून अखंड नंदादीप तेवता असून गाभारा पेशवाई कालीन हेमाडपंथी मंदिर आहे.चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा सोन्याचा कळस आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.
5)ओझंर- विघ्नहर -विघ्नेश्र्वर - VigheShwar Ojhar information in Marathi
विघ्नहर-विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा विनायक मंदिर पुढे २० फुट लांब सभागृह तसेच गाभारा १० बाय १० फुट आहे पेशवाई यांनी मंदिर बांधले असून पुर्वास्थितीला मूर्ती असून नाभी हिरे आहेत डाव्या सोंडेची मूर्ती मांडी घातलेली आहे.दगडी तट चारही बाजूस असून रेखीव दीपमाळा आहेत दोन,अभिनंदन राजाने त्रिलोकाधीश होण्यासाठी होम चालू केला होता भीतीने इंद्र देवाने विघ्न आणायला सुरवात केली गणपती ला आराधना करून शरण आले व विघ्नहर म्हणून वास्तव करू लागले दानव.
जाण्यासाठी मार्ग -नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० वरील नारायणगाव व आळे फाटा जवळ. कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील मढपासूनजवळ. ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी मार्गे जुन्नर.
6) गणपती -गिरिजात्मज (लेण्याद्री) -Girijatmka lenyadri information in Marathi
माता पार्वतीच्या तपश्चर्येचे फळ तसेंच डोंगरातील अनेक गुहेतील 8व्या क्रमांक वर विराजमान असलेले एका अखंड दगडात गुहा कोरलेली आहे एका दगडावर श्रींची मूर्ती कोरलेली सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो.12 वर्षे तपोसाधना केली श्रीं णी बटू रूपात दर्शन मातेला दिले.दगडी खांबावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. पेशवाई काळात या मंदिराचा सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे बांधले गेले.गणेश लेणी समूहात २ चैत्यगृहे, २८ विहार, पाण्याची १५ कुंडे आणि ६ शिलालेख आहेत.
जाण्यासाठी मार्ग -पुण्यातून नाशिक महामार्गाने नारायणगाव-ओझरमार्गे लेण्याद्री : ८९ किमी
पुण्यातून नाशिक महामार्गाने जुन्नरमार्गे लेण्याद्री : ९९ किमी
7)अष्ठविनायक गणपती बल्लाळेश्वर (पाली) -Ballaleshwar Pali information in marathi
भक्ताच्या बल्लाळ नावाने प्रसिद्ध असणारा पालीचा बल्लाळेश्वर लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात समावेश करणारे फडणवीस होते.बांधकाम भुईकोट किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसते .दररोज सूर्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात.अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे धारण केलेली आहेत.बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणेश त्या मुलाने पुजलेल्या शिळेत येऊन राहिले आणि त्यांनतर बल्लाळ विनायक बल्लाळेश्ववर म्हणुन ओळखले जाऊ लागले
जाण्यासाठी मार्ग -पुणे ते पाली अंतर 111km,
8)रांजणगाव महागणपती Ranjngaon Mahaganapati information in Marathi
-उजव्या सोंडेचा गणपती असून कमळ आसन आहे.10 हात आहेत व १० सोंडी अशी मूर्ती तळघर बांधले. प्रसन्न व मनमोहक मूर्ती आहे.गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर असून तो अगदी उन्मत झालेला होता सर्व देवांना जिंकले तेव्हा विनंती वरून भगवान शंकर यांनी परिपत्य केले विनायक यांस प्रसन्न करून घेतले तो दिवस होता त्रीपुरी पौर्णिमा जाण्यासाठी मार्ग -रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी आहे.