10 lines on eagle in marathi गरुड हा शिकारी पक्षी असुन हा पक्ष्यांचा राजा समजला जातो.पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अॅक्सिपिट्रिडी कुळातील हा पक्षी आहे. गरुड यां पक्ष्याला इंग्रजी मध्ये eagle असे म्हणतात.
गरुड पक्षी वर मराठी माहिती निबंध |10 lines on eagle in Marathi
1)घारीपेक्षा हा पक्षी आकाराने खुप मोठा असतो.
2)शरीराची लांबी ६०-९० सेमी. असते.
3)आकाशात घिरट्या घालीत ते भक्ष्याची टेहळणी करीत असतात
4)गरुड आणि ससाणा यांची दृष्टी सर्व पक्ष्यांपेक्षा तीक्ष्ण असते.
5)मोठे कीटक व मृत जनावरांचे मांसही खातो. त्यामुळे तो परिसर स्वच्छ राखण्याचे काम करतो.
6)भक्ष्याची शिकार फक्त दिवसा करतो
7)लहान कोकरू उचलून नेण्याएवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते.
8)गरुडाचे घरटे उंच झाडाच्या शेंड्यावर, कडेकपारीत किंवा सुळक्यावर बांधलेले असते.
9)अंडे सु. ७५ मिमी. व्यासाचे, पांढरट रंगाचे आणि तपकिरी ठिपक्यांचे असते.
10)गरुडाचा आयु:काल २५-३० वर्षांचा असतो.
सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, पहाडी, कृपण, ठिपक्यांचा, शाहाबाज, सर्प, टकल्या, बादशाही असे गरुडांचे प्रकार आहेत. पिंगट गरुडाचे शास्त्रीय नाव अॅक्विला रॅपॅक्स आहे. रंगावरून त्याला ‘पिंगट गरुड’ म्हणतात.
अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचा -
Tags:
Essay