सर्कशीतील हत्तीचे मनोगत - हत्तीचे मनोगत मराठी निबंध
मी हत्ती बोलतोय आज माझं मनोगत व्यक्त करतोय. माझा जन्म होऊन 2 वर्षे झाली असतील आम्ही आमच्या सहकुटुंब सोबत मजेत दिवसभर हिंडत असायचो. मोकळ्या हवेत निसर्गाच्या कुशीत जिकडे जावं वाटेल तिकडे हिंडत राहायचो. आमच्या जंगलात आम्हांला कांय खावं वाटेल ते खाण्यासाठी भेटतं असे कोणतंही बंधन कधीही नसायचं.तहान लागली की तळ्यावर पाणी पिण्यासाठी जायचं पाण्यात डुंबत राहायचं माती अंगावर शावर सारखी घेतं राहायची असा आमचा नेहमीचा दिनक्रम असायचा. आमचं जीवन सुखं समाधानातं असायचं कितीही प्रमाणात हवं तेव्हा खेळता बागडता येतं असायचं.हेचं सर्व जिवन माझं काही दिवसात बदललं गेलं मला साखळ दंडानं बांधून सर्कशीत आणलं गेलं. हिथं लहान ते थोरांनपर्यंत सर्वांचे मनोरंजन करायचं काम मला लावलं गेलं सर्वांना वाटेल तिथे त्यांच्याप्रमाण मनोरंजन करण्यासाठी आम्हांला गुरूंकडून शिक्षण दिलं गेलं. शिक्षण घेताना आम्ही दररोज वाटेल तिथे चुकत असतो मग आम्हांला फटके सुद्धा खावे लागतात ते फटके मुकाट्यानं सहन करावे लागतात. बांधला गेला जातोय आम्हांला साखळी ने सुटु नये म्हणून पहा ना आमचं कांय आयुष्य आणि कांय करून ठवलंय आमच्या वनात येऊन आम्हांला सिमेंटच्या जंगलात आणून ठेवलंय आमचं सर्व बालपण हिरावून घेतलंय.यांतून सुटका व्हायला हवी आमचं जिवन जंगलातील सृष्टीला नव्याने पहायला आम्हांला मनापासुन आवडतं.आम्ही असं की आमच्याकडे सर्व अधिकार असूनही आम्हांला एका साखळीत बांधून ठेवलं गेलंय. आमच्याकडे पहा सर्व जण सर्कशीत नकोय तर आम्ही जंगलात छान दिसतोय. चला आता आम्ही आटोपलं आमचं मनोगत आम्हांला चार शब्द बोलता आलं बोलून गेलो. आमच्याकडे वेदना मांडून ठेवल्या गेल्या त्या तुमच्याकडे बोलून दाखवल्या काही चुकलं असेल तर मनापासून शमस्व.