प्राण्यांचे आवाज prani v tyanche Aavaj
प्राणी हे प्रामाणिक असुन त्यांच्याबाबत आपल्या सर्वांकडे दयाशील करुणा असावी. प्राणी हे वेगवेगळे खाद्य खातात. वेगवेगळे ठिकाणी राहतं असतात. तसेच प्राणी त्यांच्या बोलण्यानुसार आवाज काढत असतात. आणि आपल्या असणाऱ्या सहकारी यांना एकत्र करण्याचं कामं करत असतात. आपण सर्वजण पाहत असतो की प्राणी पशु पक्षी यांना बोलता येतं नाही त्याचंप्रमाणे ते त्यांच्या आवाजानुसार सर्वांना एकत्र आणण्याचं कामं करत असतात. तसेच कोणतंही संकटाच्या आधी पूर्वसूचना विशिष्ट आवाजानुसार देतं असतात.
आपण आज प्राणी यांचा आवाज यांची माहिती सविस्तर घेण्यात येणारं आहे.
प्राणी यांचे आवाजाने विशिष्ट आपल्याला पूर्वसूचना सुद्धा मिळतं असते. उदा. चातक हा पक्षी पाऊस येण्याच्या आगोदर कुहू कुहू असा आवाज काढून शेतकरी वर्गाला एक चाहूल देतं असतो तुम्ही तुमची मशागती ची कामे चालू करा पाऊस येण्यासाठी जवळ येतं आहे. चातक पक्षी पाहिला पाऊस येतो त्याची वाट पाहत असतो आणि तेच पाणी पित असतो.
प्राणी व त्यांचे आवाज prani v tyanche aavaj
1)कावळ्याच्या आवाजाला काय म्हणतात.
कावळ्याचा आवाज काढून दाखवा.
कावळ्याच्या आवाजाला काव काव असे म्हणतात.
कावळा crow कावकाव Kav Kav.
2)कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात.
कबुतरच्या आवाजाला गुटर्रघुम घुमणे असे म्हणतात.
कबुतर (Pigeon) गुटर्रघुम (घुमणे) (Gutarghum)
3)कुत्रा या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात.
कुत्रा या प्राण्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हणतात.
कुत्रा (Dog)भुंकणे (Bhunkne)
4)मांजराच्या आवाजाला काय म्हणतात.
मांजराच्या आवाजाला माँव-माँव असे म्हणतात.
मांजर (Cat) माँव-माँव (Maw-Maw)
5)भुंग्याच्या आवाजाला काय म्हणतात.
भुंग्याच्या आवाजाला गुंजराव असे म्हणतात.
भुंगे (Honeybee) गुंजराव (Gunjarav)
6)पोपटाच्या आवाजाला काय म्हणतात.
पोपटाच्या आवाजाला विठू विठू असे म्हणतात.
पोपट (Parrot) विठू विठू (Vithu vithu)
7)चिमणीच्या आवाजाला काय म्हणतात.
चिमणीच्या आवाजाला चिवचिव असे म्हणतात.
चिमणी (Sparrow) चिवचिव (Chivchiv)
8)हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात.
हत्तीच्या आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.
हत्ती (Elephant) चित्कारणे (Chitkarne)
9)घोड्याच्या आवाजाला काय म्हणतात.
घोड्याच्या आवाजाला खिंकाळणे असे म्हणतात.
घोडा (Horse) खिंकाळणे (Khinkalne)
10)पक्षीच्या आवाजाला काय म्हणतात.
पक्षीच्या आवाजाला किलबिल असे म्हणतात
पक्षी (Bird)किलबिल (Kilbil)
11)सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात.
सिंहाच्या आवाजाला गर्जना किंवा डरकाळी असे म्हणतात.
सिंह (Lion)गर्जना/डरकाळी (Garjana/Darkali)
12)वाघाच्या आवाजाला काय म्हणतात.
वाघाच्या आवाजाला डरकाळी असे म्हणतात.
वाघ (Tiger)डरकाळी (Darkali)
13)गाईच्या आवाजाला काय म्हणतात.
गाईच्या आवाजाला हंबरणे असे म्हणतात.
गाय (Cow)हंबरणे (Hambarne)
14)मोराच्या आवाजाला काय म्हणतात.
मोराच्या आवाजालं केकराव असे म्हणतात.
मोर (Peacock) केकराव (Kekraav)
15) कोकीळच्या आवाजाला काय म्हणतात.
कोकीळच्या आवाजाला कुहुकुहु असे म्हणतात.
कोकीळ (Kokil)कुहुकुहु (Kujan)
16)कोंबडा आवाजाला काय म्हणतात.
कोंबडा आवाजाला आरवणे असे म्हणतात.
कोंबडा (Cock) आरवणे (Aaravne)
17)सापाच्या आवाजाला काय म्हणतात.
सापाच्या आवाजाला फुत्कारणे असे म्हणतात.
साप (Snake) फुत्कारणे (Futkarne)
18)म्हशीच्या आवाजाला काय म्हणतात.
म्हशीच्या आवाजाला रेकणे असे म्हणतात.
म्हैस (Buffello) रेकणे (Rekne)
19) बेडूकच्या आवाजाला काय म्हणतात.
बेडूकच्या आवाजाला डराव डराव असे म्हणतात.
बेडूक (Frog) डराव डराव(Darav darav)
20)घुबडच्या आवाजाला काय म्हणतात
घुबडच्या आवाजाला घुत्कारणे असे म्हणतात.
घुबड (Owl) घुत्कारणे (Ghutkaarne)
21)डासाच्या आवाजाला काय म्हणतात.
डासाच्या आवाजाला गुणगुणणे असे म्हणतात.
डास (Mosquito) गुणगुणणे (Gungunane)
22)उंटाच्या आवाजाला काय म्हणतात.
उंटाच्या आवाजाला रेकणे असे म्हणतात.
उंट (Camel)रेकणे (Rekne)
23)गाढवंच्या आवाजाला काय म्हणतात.
गाढवंच्या आवाजाला रेकणे असे म्हणतात.
गाढव (Donkey)रेकणे (Rekne)
24)गिधाड च्या आवाजाला काय म्हणतात.
गिधाड च्या आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.
गिधाड (Vulture) चित्कारणे (Chitkarne)
25)माकडाच्या आवाजाला काय म्हणतात.
माकडाच्या आवाजाला चीं चीं असे म्हणतात.
माकड (Monkey) चीं चीं (Chi Chi)
26)बैलाच्या आवाजाला काय म्हणतात.
बैलाच्या आवाजाला हंबरणे असे म्हणतात.
बैल (Ox) हंबरणे (Hambarne)
27)माशीच्या आवाजाला काय म्हणतात.
माशीच्या आवाजाला गुणगुणणे असे म्हणतात
माशी (Fly)गुणगुणणे (Gungunane)
28)ससानाच्या आवाजाला काय म्हणतात.
ससानाच्या आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.
ससाणा (Kite) चित्कारणे (Chitkarne)
29)हंस च्या आवाजाला काय म्हणतात.
हंसच्या आवाजाला कलरव असे म्हणतात.
हंस (Swan)कलरव (Kalrav)
30)कोल्ह्याच्या आवाजाला काय म्हणतात.
कोल्ह्या च्या आवाजाला कोल्हेकुई असे म्हणतात.
कोल्हा (Fox)कोल्हेकुई (Kolhekui)
आपल्याला माहिती असणारे अजूनही काही आवाज
1)पक्ष्यांच्या भांडणाला काय म्हणतात.
पक्ष्यांचे भांडणला कलकलाट असे म्हणतात.
2)पक्षीच्या पंखाला काय म्हणतात.
पक्षीच्या पंखांचा फडफडाट होतो.
3)पानांच्या आवाजाला काय म्हणतात.
पानांच्या आवाजाला सळसळ असे म्हणतात.
4)पाण्याच्या आवाजाला काय म्हणतात.
पाण्याच्या आवाजाला खळखळाट असे म्हणतात.
5) पावसाच्या आवाजाला काय म्हणतात.
पावसाच्या आवाजाला "रिमझिम रिपरिप " असे म्हणतात.
6) पैंजणांच्या आवाजाला काय म्हणतात.
पैंजणाच्या आवाजाला छुमछुम असे म्हणतात.
7)घंटाच्या आवाजाला काय म्हणतात.
घंटांचा आवाजाला घणघणाट असे म्हणतात.
8)ढगांच्या आवाजाला काय म्हणतात.
ढगांचा आवाजाला गडगडाट असे म्हणतात.
9)डासांच्या आवाजाला काय म्हणतात.
डासांच्या आवाजाला भुणभुण असे म्हणतात.
10)तलवारीची आवाजाला काय म्हणतात
तलवारींचा आवाजाला खणखणाट असे म्हणतात.
11) तारकांच्या आवाजाला काय म्हणतात.
तारकांचा आवाजाला चमचमाटत असे म्हणतात.
12) नाण्यांचा आवाजाला काय म्हणतात.
नाण्यांचा आवाजाला छणछणाट असे म्हणतात.
13)बांगड्यांचा आवाजाला काय म्हणतात.
बांगड्यांचा आवाजाला किणकिणाट असे म्हणतात.
14)रक्ताच्या आवाजाला काय म्हणतात.
रक्ताच्या आवाजाला भळभळ असे म्हणतात.
15)विजांच्या आवाजाला काय म्हणतात.
विजांचा आवाजाला कडकडाट असे म्हणतात.
निष्कर्ष -
आपण आजच्या लेखात प्राणी व त्यांचे आवाज सविस्तर माहिती घेतलेली आहे. प्राणी पक्षी पशु यांचे आवाज हे अतिशय छान आहेत त्यांच्या आवाजामुळे भाषा प्राप्त होते. संकटाना दुर करण्याची क्षमता आवाजात आहे. माया प्रेम यांची शिदोरी म्हणजे आवाज होय. दयाशील क्षमाशील प्राणी असुन प्रत्येकाने प्राणी मात्रावर मनापासून प्रेम करावे. आजच्या लेखातील माहिती कशी वाटली ती आम्हांला जरूर सांगा.
हे ही आपण माहिती घेऊ शकतात.