आजच्या लेखात आपण जिवनसत्व म्हणजे काय जीवनसत्व प्रकार किती कोणते आहेत. जिवनसत्व गट किती आहेत जिवनसत्वाचे शोध कोणी लावला. जिवनसत्वा अभावी होणारे आजार हे आपण माहिती घेणारं आहोत. आपल्याला दररोज आहारात समाविष्ट असणाऱ्या भाज्या फळं, कडधान्य यांतूनचं आपल्याला भरपूर प्रमाणात पुरक समाविष्ट असा पोषक आहार मिळतं असतो.
जिवनसत्व हे आपल्या शारीरिक गरजा पुर्ण करण्यासाठी अतिआवश्यक असते. आपल्याला गरजा या योग्य आणि पुरक समतोल आहारातून मिळतं असतो.. याची माहिती घेऊयात.
जिवनसत्व म्हणजे काय.
जिवनसत्व - जिवाला योग्य कार्य चयापचय करण्यासाठी आवश्यक पोषक घटक आहारातून पुरवला जातो त्यास जिवनसत्व असे म्हंटले जाते.कार्बनी संयुगाने जिवनसत्व असे म्हणतात.
जिवनसत्व मुख्य प्रकार
जिवनसत्वाचे मुख्य दोन प्रकार आहेत त्याची माहिती आपण घेऊयात.
1)पाण्यात विरघळणारे
‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळत असतात.
2) मेदात विरघळणारे|स्निग्ध पदार्थ विरघळणारे.
अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत मेदात विरघळत असतात. पाण्यात विरघळले जातं नाहीत.
जीवनसत्व गट-
जीवनस्तव गट एकूण सहा आहेत त्यामध्ये जीवनसत्व अ,ब,क, ड,ई, के, असे गट आहेत.
जिवनसत्व अ गट -
आपल्याला पोषक घटका मधून अ जिवन सत्व मिळाले पाहिजेत. दृष्टी मजबुत होते.भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरभरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य इत्यादी आपल्या आहारात समावेश करावा.
जिवनसत्व ब गट -
हिरव्या भाज्या,बटाटा, सफरचंद, चिकू फळांच्या साली, डाळींचे टरफल, डाळीचे पेज,आहारात समावेश करावा.
जिवनसत्व क गट-
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोड आलेल्या धान्यात विटामिन सी जास्त प्रमाणत असते.लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या,आपल्याला आहारात समावेश करावा.
जिवनसत्व ड गट
शेंगदाणा तेल, जवस तेल, सरकी तेल इ. केळ, दुध, ताक, दही यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.आपल्या आहारात समावेश असावा.
जिवन सत्व के गट
पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते.आपल्या आहारात समावेश असावा.
जीवनसत्व ई गट
करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यां लोणी
जीवनसत्वाचा शोध कोणी लावला-
जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने इ.स १९१२ मध्ये लावला.त्याने त्यांना व्हिटॅमिन असे नाव दिले.
जीवनसत्व अभावी होणारे रोग
अ जिवनसत्व अभावी होणारे आजार
कान, डोळे, मूत्रपिंड, त्वचा, पोट, मूत्राशय, फुफ्फुसे, आतडी, दात आणि रक्तक्षयाचे विकार, भूक न लागणे.हे रोग अ जीवनसत्वाच्या अभावी होऊ शकतात.रातआंधळेपणा हा आजार अ जिवनसत्व अभावी होतो.
ब जिवनसत्व -
बेराबेरी हा आजार जीवनसत्त्व "ब "च्या कमतरतेमुळे होतो.
क जिवनसत्व अभावी होणारे रोग -
हिरडी सुजणे,हिरडीतून रक्त येणे,
संधिवात त्रास होतो.दात पडणे,केस गळणे.
ड -जिवनसत्व अभावी होणारे रोग-
मुडदुस हा आजार ड जिवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं असतो.
लहान मुलांचे हात पाय ढिले पडणे.तसेच वाकणे हे माहिती होते.गरोदर मातेला प्रसूतीची बाधा आणली जाते.
हात पायाच्या सांध्यामध्ये सुज होते.
बालकाच्या छातीची हाडे दिसणे.
मुलांच्या हाडात गाठी होणे कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात.
निष्कर्ष -
जीवनसत्व हे आरोग्य उत्तम पुरक सदृढ राहण्यासाठी आवश्यक आहे. आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी आपण दररोज पुरक समतोल आहार घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपण जेवणा मध्ये फळे भाज्या, डाळी, दुध लोणी याचा वापर करणे गरजेचं आहे.
आजच्या लेखामधील माहिती तुम्हांला आवडली असेल अशी आशा आहे.तुम्हांला अजून काही माहिती हवी असल्यास किंवा तुमच्याकडे अजून काही माहिती असल्यास तुम्ही कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहू शकतात.
धन्यवाद.