जातीचा दाखला कसा काढायचा|जातीचा दाखला अर्ज नमुना |जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
Caste certificate documents in marathi documents required for caste certificate in maharashtra in marathi जातीचा दाखला कागदपत्रे
जातीचा दाखला काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे पाहणार आहोत त्याच प्रमाणे जातीचा दाखला आपल्याला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शाळेमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक असतो.
आणि हा जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक ती कोण कोणती साधारणपणे कागदपत्रे लागतात कोण कोणते पुरावे लागतात हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत.
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1)ओळखीचा पुरावा.
ओळख पुरावा जात दाखला काढण्यासाठी आपल्याला सादर करणे आवश्यक असतो त्याचप्रमाणे आपण खालीलप्रमाणे सादर करू शकतो मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक दाखला / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड
वरील प्रमाणे ओळख पुरावे सादर करावेत.
2)पत्त्याचा पुरावा
जातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याला पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असतो त्याच्यामध्ये खालील प्रमाणे पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे
मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट)/ वाहनचालक दाखला / आधार कार्ड / वीज देयक/ पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती. आपण जातीचा दाखला काढण्यासाठी पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
3)जात पुरावा -
1)शपथपत्र (प्रपत्र २)
2)स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा
1 ज्याच्या नावाने अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जदाराचे वडील याचा शाळा दाखला
2)आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा
3)अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
4)अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा.
5)अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा
6) शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
7) अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र.
8)ग्रामपंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत.
9)जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे.
10) सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे.
11)नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र
12) नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र.
@विवाहित महिला जातीचा दाखला काढावंयाचा असल्यास-
1)विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा असल्या बाबत दाखला
२) विवाह नोंदणी प्रमाणपत्र
जातीचा दाखला आपल्याला विविध आरक्षण मिळविण्यासाठी तसेच आपल्याला शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आणि शाळेत शाळा कॉलेज विविध पोलिटिकल संस्था शासकीय निमशासकीय आरक्षणामध्ये लाभ मिळविण्यासाठी निवडणूक आयोगा मध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी आपल्याला दाखला आवश्यक असतो आणि दाखला जातीचा आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक असतो.